तळेगाव दाभाडे दि.५- एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सदैव राष्ट्रहितासाठी तत्पर असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदु परिषद,बजरंग दल या देशभक्त व हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना तालीबान या आतंकवादी संघटनेशी करणाऱ्या देशद्रोही-विघटनवादी लेखक-गीतकार जावेद अख्तर याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्ष तळेगाव शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.*
देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या जावेद अख्तर याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
देशात लाखो सेवाकार्याच्या माध्यमातून तसेच अनेक संकटांच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या संघ स्वयंसेवक व देशातील हिंदूंचा अपमान या बहुसंख्य हिंदुंच्याच जीवावर पोट भरणार्या देशद्रोही जावेद अख्तर याने केला आहे.त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा याकरिता तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री.झोल साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.रवींद्र नाना दाभाडे,शहराध्यक्ष श्री.रवींद्र बाळासाहेब माने,मा.नगरसेवक श्री.सचिन टकले,युवा मोर्चा अध्यक्ष (स्टेशन विभाग)श्री.शिवांकुर खेर,युवा मोर्चा अध्यक्ष (गाव विभाग) श्री.अक्षय (बंटी) भेगडे,सोशल मिडीया कार्याध्यक्ष श्री.सचिनजी भिडे,युवती आघाडी अध्यक्षा कु.अपूर्वाताई मांडे,कार्याध्यक्षा कु.धनश्रीताई बागले,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष श्री.अनिलजी वेदपाठक,व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री.निर्मलभाई ओसवाल,ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री.नितीनभाऊ पोटे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस श्री.रवींद्र साबळे यांनी केले.
या निषेध मोर्चाला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या गटनेते श्री.अरुण ज. भेगडे (पाटील),सरचिटणीस श्रीमती रजनीताई ठाकूर,सौ. शोभाताई परदेसी श्री.विनायक गं. भेगडे,सोशल मीडिया अध्यक्ष श्री.उपेंद्रभाऊ खोल्लम,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सरचिटणीस श्री. दिलीपजी सुतार,महिला मोर्चा तळेगाव स्टेशन कार्याध्यक्षा सौ.तनुजाताई दाभाडे, उपाध्यक्ष श्री. संजयभाऊ जाधव ,व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष श्री.सागरभाई शर्मा,ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्री. आशुतोष हेंद्रे ,युवा मोर्चा स्टेशन विभाग सरचिटणीस श्री.निखिल म्हाळसकर,युवा मोर्चा सोशल मीडियाप्रमुख श्री.विशाल दादा जव्हेरी,युवती आघाडी सरचिटणीस कु. तेजल भेगडे, सोशल मीडिया सरचिटणीस सौ. प्रियांकाताई बोरकर समन्वयक श्री. प्रसन्न धारणे,ओबीसी आघाडी कार्यकारिणी सदस्य श्री संतोष भाऊ शिंदे,सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप भाऊ डोळस हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या