Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती मावळ वतीने उद्या महालसीकरण अभियान...मावळ तालुक्यात पावणेतीन लाख नागरिकांचे डोस पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा...


वडगाव मावळ दि.१६ - मावळ तालुक्यांमध्ये पंचायत समिती वडगाव मावळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून उद्या दिनांक १७/९/२०२१ रोजी मावळ तालुक्यांमध्ये पंचायत समिती मावळ यांच्या उपकेंद्रावर महालसीकरण अभियान राबवले जात आहेत अशी माहिती सभापती ज्योतीताई शिंदे , उपसभापती दत्ता शेवाळे यांनी दिली.

        मोदी सरकार कडून राज्य सरकार तसेच जिल्हा विभागीय केंद्रांना मोठ्या प्रमाणामध्ये लसींचा पुरवठा होत असून त्या माध्यमातून तालुकास्तरावर महालसीकरण अभियान विविध स्तरावर ती राबवले जात आहेत.

         आत्तापर्यंत मावळ तालुक्यांमध्ये पावणेतीन लाख नागरिकांना मोफत लस दिल्याने पंचायत समिती मावळ , भारतीय जनता पार्टी मावळ यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे. 
____________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या