पवन मावळ भागातील शिवप्रसाद मंगल कार्यालयाच्या मैदानात व चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानात अशा दोन ठिकाणी हे प्रशिक्षण घेण्यात आले समाजामध्ये महिलांवर अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे महिला जर स्वतःचं रक्षण स्वतः करू शकल्या तर होणाऱ्या या अत्याचाराला आळा बसू शकतो स्री ही अबला नसून सबला आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांच्यातील शक्ती जागृत करण्यासाठी त्यांना विठुमाऊली सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून लाठी काठी प्रशिक्षण व स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.
या प्रशिक्षणाचे आयोजक विठूमाऊली सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ राक्षे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केलं. माझ्या भागातील माझी प्रत्येक बहीण सक्षम झाली पाहिजे तिला स्वतः रक्षण करता आले पाहिजे तिचा आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे असा असा उदात्त भाव त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केला.
किरण भाऊंनी हे जे आम्हा सगळ्या तरुणींसाठी लाठी काठी प्रशिक्षणाचे आयोजन केलं खरंच हे आम्हा मुलींसाठी पुढील काळात खूप महत्त्वाचं ठरणार आहे यांना आमचा स्वतःचा आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन आम्ही चांगल्या प्रकारचे सक्षम होऊ इतका छान उपक्रम किरण भाऊंनी घेतला त्याबद्दल या प्रशिक्षणाचे लाभार्थी म्हणून मी त्यांचा मनापासून आभार मानते - साक्षी भिंगारे .
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा बाळासाहेब खांडभोर यांनी केले,
प्रास्ताविक संतोष बांदल यांनी केले.
यावेळी सभापती ज्योतीताई शिंदे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर सर,भाजपा संघटन मंत्री किरण राक्षे, जी प सदस्या अलकाताई धानिवले,मा सभापति निकिता घोटकुले ,मा. जि प सदस्या सुमित्रा जाधव ,येळसे सरपंच सीमाताई ठाकर ,चांदखेड सरपंच अंजलीताई धावडेकर ,माजी सरपंच रूपालीताई गायकवाड, मीनाक्षी सोरटे ,सुजाता पडवळ, मनिषा येवले, अर्चना विधाटे, वैशाली घारे, भाग्यश्री आगळे, माजी सरपंच संतोष बांदल, शिवाजीनाना गायकवाड, अध्यक्ष दत्ता पानसरे ,संतोष आगळे, बाळासाहेब धावडेकर, प्रमोद गायकवाड ,सुभाष पडवळ नीलेश कडू तसेच प्रशिक्षक अर्चना आडागळे , विठू माऊली सोशल फाउंडेशन चे सर्व सदस्य याठिकाणी उपस्थित होते.
0 टिप्पण्या