नाणे मावळ पीएमआरडीए कृती समितीच्या वतीने मा. तहसिलदार कार्यालय वडगाव मावळ व पीएमआरडीए क्षेत्रीय अधिकारी यांना पीएमआरडीए आराखडा संदर्भात भेट देण्यात आली. त्यावेळी त्यांना शेतकरी बांधवांचे जमिनीवर टाकलेली आरक्षणे त्यावर ज्या हारकती आल्या आहेत. त्याप्रमाणे बदल करण्यात यावा अन्यथा लवकरच तालुका व्यापी आंदोलन करण्यात येईल. व हरकतीकरीता अधिक वेळ द्यावा तसेच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात नकाशे प्रसिद्ध करावेत जेणेकरून सर्व नागरिकांना प्रारुप आराखड्यास हरकत सुचना घेणं सोईस्कर होईल. अशा पध्दतीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी कृती समिती अध्यक्ष सचिन येवले उपाध्यक्ष अशोक कुटे कार्याध्यक्ष सुरेश जाधव सचिव बाळासाहेब येवले कायदेशीर सल्लागार अँड. सुभाष तुपे, प्रदिप हुलावळे, मच्छिंद्र केदारी, जितेंद्र बोत्रे, दत्तात्रय पडवळ, किसन येवले, अमोल केदारी, हरीष पडवळ, सुनील गुजर, जग्गनाथ येवले, सचिन कडू, सागर शिंदे, संदिप उंबरे, लतीफभाई शेख उपस्थित होते.
0 टिप्पण्या