Ticker

6/recent/ticker-posts

PMRDA संबंधित कृती समिती... नेमकी शेतकऱ्यांची कोणती ?

वडगाव मावळ दि.८ - पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण पीएमआरडीए PMRDA यांच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत  पुणे जिल्ह्यातील ८१४ गावात ६९०० चौ.कि.मी जमिनीवर PMRDA ने प्रारूप आराखडा तयार केला. यात मावळ तालुक्यातील अनेक नागरिकांच्या तसेच शेतकर्‍यांच्या जमिनीवर चुकीच्या पद्धतीच्या आरक्षण पडली तसेच अनेक त्रुटी आराखड्यात आहेत त्यामुळे मावळ तालुक्‍यातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे .

      PMRDA संदर्भात मावळ तालुक्यामध्ये नाणे मावळ कृती समिती, एकविरा कृती समिती याच प्रमाणे मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी जिल्हा दौरा करून या  संदर्भात हरकती कशा नोंदवाव्यात याबाबत मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आले आहे. असे असताना नेमकी शेतकऱ्यांसाठी न्याय मागणारी कृती समिती कोणती हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे.
    
       PMRDA चे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आहेत असे असताना मावळ तालुक्यातून शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे नेते हे कृती समितीच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत यातून सर्वसामान्य जनता सरकार मध्ये नक्की काय चाललं आहे हे त्यांना समजणे कठीण झाले आहे. सत्तेवर तिथे असताना माननीय मुख्यमंत्री यांची भेटच का घेत नाही. हा प्रश्न का त्यांच्या समोर का मांडत नाही. आंदोलन करण्याची वेळच का येते असा प्रश्न सहज सामान्य नागरिकांना पुढे पडत आहे.

        राज्यामध्ये महाआघाडीचे सरकार आहे यामुळे या आराखड्याबाबत भारतीय जनता पार्टीने विरोधात भूमिका घेऊन जिल्ह्यामध्ये वातावरण तापवले आहे. निरनिराळ्या ठिकाणी बैठका घेऊन कृती समितीच्या माध्यमातून काही नेते जनजागृती मार्गदर्शन करत आहेत यामध्ये सर्वसामान्य नागरिक शेतकरी नेमकी आपली बाजू मांडणारी कृती समिती कोणती याबाबत संभ्रमात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या