Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मध्ये महा लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद...


केंद्र सरकारने राज्याला लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केल्याने राज्यातील तसेच जिल्ह्यामधील विविध ठिकाणी महालसीकरण मोहीम राबवण्यात आली 

        मावळ तालुक्यांमध्ये ही पंचायत समिती च्या उपकेंद्रात तसेच हॉस्पिटल धार्मिक ठिकाणी या लसीचे मोहीम करण्यात येत असून कामशेत मधे १२, वडगाव मधे २२,सोमाटणे येथे ८ केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे होते.

         कामशेत शहरात विविध ठिकाणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळे ,खाजगी हॉस्पिटल, भैरवनाथ मंदिर खामशेत, श्रीराम मंदिर माऊली नगर यथे लसीकरण होत असून शहरातील स्थानिक प्रतिनिधी हे केंद्रावर भेटीगाठी घेत आहेत याचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळे यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या