मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला या प्रकरणात महाराष्ट्रातील रणरागिनी असणाऱ्या सुप्रियाताई सुळे, रुपालीताई चाकणकर, ऊर्मिला मातोडकर यांनी महाराष्ट्राच्या बाहेरील काही घटना घडली की त्या वेळेस तेथील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या अशा गर्जना करणाऱ्या महाराष्ट्रातच शांत का ? हा पीडितेवर अत्याचार नाही का? घटना महाराष्ट्रातील नाही का ? यातही राजकारण होतंय का?.
या बलात्काराची संतापजनक घटना समोर आलीय. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या शहरात महिलेवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर इतर शहरांमधील परिस्थितीत काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहे. पोलिसांना संबंधित परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीचे दुष्कृत्य कैद झालं आहे. रात्रीच्या अंधारामुळे सीसीटीव्हीत फारसं स्पष्ट दिसत नाहीय. पण परिसरात संशयास्पद घटना घडतेय, ते स्पष्टपणे जाणवत आहे.
७ सप्टें-पुण्यात १४ वर्षीय मुलीवर बलात्कार.
९ सप्टें-पुण्यात ६ वर्षीय मुलीवर बलात्कार.
९ सप्टें-खेडमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार.
१० सप्टें-मुंबईत तरुणीवर बलात्कार. अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात यात महाआघाडी सरकारमधील पवारसाहेब चिडीचुप,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिडीचुप,संजय राऊत चिडीचुप,
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चिडीचूप,
उपमुख्यमंत्री अजितदादा चिडीचूप साहजिकच काही माध्यमे ,पत्रकारही चिडीचुप आहेत.
0 टिप्पण्या