वडगाव मावळ दि.१४ - कार्यशील
महागाव- चांदखेड जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले यांच्या निधीतून मावळ तालुक्यातील कामशेत व खामशेत मधील वारकरी भजनी मंडळांना भजनी साहित्याचे येथील मावळ पंचायत समितीच्या आवारात मंगळवारी (दि.१४) वाटप करण्यात आले.
माजी सभापती सुवर्णा कुंभार यांच्यावतीने मागणीची दखल घेऊन
कामशेत येथील सिद्धिविनायक भजनी मंडळ इंद्रायणी कॉलनी व भोईराज भजनी मंडळ खामशेत येथील भजनी मंडळांना वीणा, टाळ, मृदुंग, हार्मोनियम आदी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले म्हणाले वारकरी संप्रदायाचा वसा व वारसा चालविण्यासाठी भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य वाटप केले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख संतोष कुंभार, ज्ञानेश्वर शेळके, ईश्वर पवार, अर्जुन गायखे, काशिनाथ येवले, शंकर ठोसर, अंकुश तोंडे, सुरेश इंगुळकर, नाथा साठे, ज्ञानेश्वर लालगुडे, विठ्ठल ढोरे, रामभाऊ ठुले, विलास गायखे, नितीन गायखे, वामन गायखे सुरेश जाधव , बाळासाहेब पवार, प्रकाश पवार, कुंडलिक साठे, बाळासाहेब गायखे व बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.
0 टिप्पण्या