Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने उद्या दिनांक १० रोजी तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक ४ रद्द होण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन....ठिकाण -मंगरूळ – आंबी चौक ,एम.आय.डि.सी रोड,आंबी

शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक १० रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी दिली.

            मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक ४ मधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे विविध मागण्यांबाबत तसेच मावळ तालुक्यातील निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी, कदमवाडी, एमआयडीसी टप्पा क्र. ४ कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सातबारावरती टाकलेले ३२ (२) हे शिक्के काढण्यासाठी, गेल्या 3 वर्षामध्ये झालेले शेतीचे गैरव्यवहार रद्द करण्यासाठी, प्रशासनातील एमआयडीसी अधिकाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीचा निषेध करण्यासाठी, चालु असलेल्या नवलाख उंब्रे एमआयडीसीतील पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा बंद करून तसेच १९९८ साली झालेल्या आंद्राधरण आणि त्या धरणामध्ये शिरे शेटेवाडी गावातील १०५ शेतकऱ्यांच्या घराचे पुनर्वसन आंबी येथील गट क्र.१४५ या शासकीय गायरानामध्ये करण्यासाठी, शासन स्थरावरील पुनर्वसन खात्यातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत पुनर्वसन होऊ शकले नाही.

त्यामुळे शासनाच्या पुनर्वसन खात्यातील अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

आंबळे, निगडे, पवळेवाडी, कल्हाट व कदमवाडी गावातील शेतकरी, महिला – भगिनी व युवकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन शेतकरी बचाव कृती समिती मावळ टप्पा क्रमांक ४ च्या वतीने करण्यात आले आहे.

शासन स्तरावर निगडे, आंबळे व पवळेवाडी या गावातील पर्यावरण दृष्टया संवेदनशील झोन रद्द करून संपादन प्रक्रिया ३२(१) तात्काळ केली तर शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने त्यांचे स्वागतच केले जाईल. अन्यथा हे आंदोलन भविष्य काळात उग्र स्वरूपात केले जाईल असा इशारा देखील कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या