बंदिस्त पवना जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या मावळ गोळीबाराच्या घटनेला १०वर्षे पूर्ण झाले. या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या १०व्या स्मृती दिनानिमित्त येळसे (पवनानगर) येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
येळसे गावातून स्मृती ज्योत पेटवून गोळीबारात बळी गेलेल्या शेतकरी कांताबाई ठाकर, शामराव तुपे, मोरेश्वर साठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पवना ही मावळच्या शेतकऱ्यांची आस्था आणि अस्मिता आहे. तिच्या पाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्राणपणाला लावून, स्वतःचे बलिदान दिले, त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय कायम असून, तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले .
समवेत यावेळी प्रभारी भास्कर म्हाळस्कर , तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे ,मा.सभापती एकनाथराव टिळे ,सभापती ज्योतीताई शिंदे ,मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,मा.सभापती ज्ञानेश्वर दळवी,मा.सभापती दत्ता शेवाळे ,मा .उपसभापती जिजाबाई पोटफोडे,मा.ता.RPI अध्यक्ष लक्ष्मण भालेराव ,संचालक शिवाजी पवार,जिल्हा परिषद सदस्य अलकाताई धानीवले,बाळासाहेब जाधव,प्रशांत ढोरे,संघटणमंत्री गणेश ठाकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,सोशल मिडीया प्रमुख सागर शिंदे,बाळासाहे घोटकुले,दि.आ.अध्यक्ष विकास लिंभोरे,संदीप भुतडा,गणेश ठाकर,मुकुंद ठाकर,ललिताताई साठे,आनंता कुडे व शहिद कुटुंबातील सदस्य आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
0 टिप्पण्या