वडगाव मावळ दि.३०: भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी वतीने पोटोबा मंदिर मावळ ते तहसील कार्यालयापर्यंत भजन करत महाराष्ट्रातील मंदिरे उघडी करण्यासाठी शंखनाद व घंटानाद आंदोलन करून भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर उघडी करावीत याचे निवेदन मा.तहसीलदार साहेब मावळ यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित मावळ भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे,मावळ भाजपा अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष ह.भ.प.सुनील महाराज वरघडे,दत्ताभाऊ महाराज शिंदे,पं.स.उपसभापती दत्तात्रय शेवाळे,शांताराम कदम,जि.कुभार समाज अध्यक्ष संतोष कुंभार ,विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,गोपीचंद कचरे,बाबाजी काटकर, देवा गायकवाड, आनंता कुडे,ह.भ.प. सुखदेव ठाकर, राजाराम असवले , रविंद्र आंद्रे यांच्यासह वारकरी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होतेे.
0 टिप्पण्या