पुणे दि.२९- PMRDA पीएमआरडीए च्या चुकीच्या प्रस्तावित प्रारुप विकास आराखड्या च्या विरोधात — माजी राज्य मंत्री मा. श्री संजय उर्फ बाळा भेगडे, यांचा पुणे जिल्हाभर दौऱ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
30 August : हवेली — शिरुर
31 August : भोर हवेली पश्चिम — वेल्हा
01 September : हवेली मध्यम — पुरंदर
02 September : मावळ — खेड
03 September : मुळशी — दौंड
“पीएमआरडीए च्या प्रस्तावित प्रारुप विकास आराखड्याला हरकती घेण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचे आदेश राज्याचे अप्पर सचिव यांनी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.”
#पीएमआरडीए : यापूर्वी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने समाविष्ट हद्दीचा प्रारुप विकास आराखडा 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केला आहे. या संदर्भात या विकास आराखड्याला हरकती घेण्यासाठी 30 ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली आहे. या नियोजित विकास आराखड्या बाबत समाधानकारक खुलासा होत नसल्याने व लोकप्रतिनिधी नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताना. माजी राज्य मंत्री मा. श्री संजय उर्फ बाळा भेगडे, यांनी पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींना समवेत घेऊन १५ दिवसांची मुदत वाढीसाठी मागणी करत नगरविकास व प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन व पत्रव्यवहार केला होता. याप्रसंगी भाजप पुणे ग्रा. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अॅड धर्मेंद्र खांडरे, जिल्हा पुणे ग्रा. संघटन सरचिटणीस, जितेंद्र बोत्रे आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यानुसार या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्र, लोकसंख्या तसेच कोविडचा विचार करता नागरिकांना आपली हरकती व सूचना नोंदवण्यासाठी वाढीव मुदत देण्याची विनंती केली होती. याला अनुसरून राज्याचे अपर सचिव किशोर गोखले यांनी यासंबंधीचा निर्देश जारी करत विहित मुदतीनंतर आणखीन पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याचा आदेश दिला आहेत. या मुदत वाढीमुळे नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला असून हरकती नोंदवण्याचा व्यतिरिक्त वेळ वेळ मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
________________________
0 टिप्पण्या