पुणे जिल्हा व मावळ तालुक्यातील प्रस्तावित रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांची पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांच्या समवेत महत्वाची बैठक संपन्न झाली.
यामध्ये पुणे जिल्हा तसेच मावळ तालुकयातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये रिंग रोड संदर्भात संभ्रमाची निर्माण झाली असून मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त भाग हा बागायती क्षेत्र असून असंख्य बाधित शेतकरयांची बागायती क्षेत्र वगळण्यात यावे.
तसेच शेतकरी व प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक घेऊन रिंग रोड हा विषय सकारात्मक पद्धतीने मार्गी लावण्यासाठी मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांना पुणे व मावळ तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी निवेदन देऊन मागणी केली असता मा.जिल्हाधिकारी यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देत लवकरात लवकर संयुक्त बैठकीचे आयोजन करणार असल्याचे आश्वस्त यावेळी केले...
यापुढील काळात शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत सरकार योग्य ती भूमिका घेत नाही तो पर्यंत रिंगरोडची मोजणी होवू देणार नसल्याची भूमिका मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी यावेळी घेतली.
0 टिप्पण्या