बजरंगदलाच्या कामाच समाज्याच्या विविध स्तरातुन होतय कौतुक.
पावसाच्या अतीवृष्टी मुळे चिपळुन व आसपासची गाव पाण्याखाली गेली होती. चिपळुन शहरात 16 फुटापर्यंत पाणी साठल होत ,अनेकींची घर पाण्याखाली गेली व्यापार्यांच्या दुकानांची भयान अवस्था झाली, प्रत्येकाच्या घरात पाणी शिरल 90% जनावर पुराच्या पाण्यात वाहुन गेली अनेकांचे संसार मोडले, जनजीवन उद्वस्त झाले, अनेक जन बेपत्ता झाले, सरकारी कार्यालयांची दुरावस्ता झाली. अश्या परस्थीतीत पुर ओसरल्या नंतर प्रत्येक घरात गाळाचा थर साचला, अस्वच्छ तेन तर थैमान घातल.
अश्या अवस्थेतेत समाज्याच्या विविध स्तरातुन मदतीचा ओघ वाढला मदत मिळु लागली परंतु घरांची झालेली दूरावस्ता गाळाचा थर सर्वत्र कचरा प्रदुषण, दलदल निर्माण झाली प्रत्येक जन आपले घर दुखाचा आवंडा गिळत स्वच्छता करु लागला परंतु ते अपुर पडु लागल प्रत्येक जन येवुन किट देवुन जातो परंतु स्वच्छता कोणच करत नाही किंवा जनावरांचे लसिकरण त्या कडे दुर्लक्ष होऊ लागल अश्या परस्तीतीत बजरंगदल पुढे सरसावल.
चिपळन मधिल अनेकांची घर स्वच्छ करणे, सरकारी कार्यालय स्वच्छता करणे, रस्तावरील गाळ काढणे, किटक नाशकांची फवारणी करणे, घरा घरात जाऊन धुराची फवारणी करणे अशी अनेक काम केली, त्याच बरोबर चिपळुन मधिल खेर्डी गावातील वाड्या वस्त्यांवर जावुन जनावरांचे लसिकरण करणे, जखमी झालेल्या जनावरांना मलम पट्टी करणे, औषध उपचार करणे अशी अनेक काम बजरंगदलाच्या माध्यमातुन सलग 3 दिवस करण्यात आली.
अनेक नागरीकांनी बजरंगदलाच्या कामाच कौतुक करत,या पुर स्तितीत आपण येवुन जे काम केल ते कोणी करत नाही अस म्हणत सर्वांचे आभार मानले
या वेळी बजरंदलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा सह संयोजक बाळासाहेब खांडभोर, अध्यक्ष प्रा गोपिचंद कचरे, महेंद्र असवले, निखिल भांगरे, अक्षय जगदाळे, सुमीत शीणगरे, रुशी वाळुज, पशू वैद्यकीय डॉ.ढ़माले, सागर भोर आदि कार्यकर्ते उपस्तीत होते.
0 टिप्पण्या