Ticker

6/recent/ticker-posts

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कृती समितीचा एल्गार...कृती समितीच्या अध्यक्षपदी सचिन येवले यांची निवड...


मावळ दि.२६- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) ने नुकताच जाहीर केलेल्या विकास आराखाड्यामध्ये गावठाण,शेती अश्या विविध क्षेत्रामध्ये आरक्षणे टाकली आहे.

    तसेच ह्या आरक्षणाबाबत बहुतांश शेतकऱ्यांन मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे जी आरक्षण टाकली त्याबद्दल ज्ञात माहिती त्यांच्या कडे नाही म्हणून नाणे मावळ भागातील सर्व सामान्य बाधित शेतकरी एकत्र येऊन ' नाणे मावळ PMRDA कृती समिती' चे गठन आज संत तुकाराम महाराज पादुका स्थान वाकसई येथे करण्यात आले यावेळी २५५ शेतकऱ्यांच्या मान्यतेनुसार "नाणे मावळ PMRDA कृती समितीची" पुढिल रचना ठरवण्यात आली व शेवट पर्यंत हा लढा एकजुटीने लढवला जाईल हा संकल्प सर्व शेतकरी बांधवांनी केला यावेळी बहुसंख्येने शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वानुमते सचिन शिवराम येवले यांची कृतीसमितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
    
            त्यावेळी त्यांनी बोलताना शेवटच्या श्वासापर्यंत PMRDA च्या चुकीच्या धोरण्यान विरोधात सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन लढा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या