Ticker

6/recent/ticker-posts

पवना बंदीस्त जलवाहीनी कायमस्वरुपी बंद करुन ७/१२ वरील संपादनाचे शेरे काढून टाकावे भाजपा किसान मोर्चा यांचे तहसिलदार यांना निवेदन ...

पवना बंदीस्त जलवाहिनी कायमस्वरूपी रद्द करून बाधित शेतकऱ्यांचे 7/12 उताऱ्यावरील संपादनाचे शेरे काढून टाकण्यासाठी आज महसूल नायब तहसिलदार केदारी साहेब यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा मावळ तालुका वतीने निवेदन देण्यात आले.

पवना बंद जलवाहिनी योजनेला विरोध करण्यासाठी मावळ तालुका शेतकरी व नागरिकांनी सन 2011 मध्ये खूप मोठे आंदोलन केले होते.यामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर *निगडी जलशुद्धीकरण केंद्र बंद पाईपलाईन करिता संपादित* असे शेरे आजही आहेत.

त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक काम करता येत नाही व शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही.म्हणून शासन स्तरावर संपादनाचे शेरे काढून टाकण्यासाठी योग्य ते आदेश द्यावे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा संतोष हरिभाऊ दाभाडे,अध्यक्ष भाजप किसान मोर्चा सुभाषराव धामणकर, गुलाबराव घारे, विकासराव शेलार,कचरू पारखी,राजाभाऊ असवले, बाळासाहेब पारखी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
----------------------------- 
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या