कांब्रे ना.मा. ग्रृप ग्रामपंचायत च्या वतीने दोन दिवसाचा मोफत जाॅबकार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
मावळ तालुक्यात प्रथमच असा उपक्रम कांब्रे ग्रामपंचायत ने घेतला असल्याने आज या कॅम्प चा शुभारंभ पंचायत समिती सभापती सौ. ज्योतीताई शिंदे, भाजपा अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे , मा. सभापती सौ. निकीताताई घोटकुले, कुभार समाजाचे अध्यक्ष मा. श्री. संतोषभाऊ कुभार, मा. उपसभापती मा.गणेशभाऊ गायकवाड जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड, विद्यमान सरपंच सौ.सुवर्णाताई भाऊसाहेब गायकवाड व उपसरपंच श्री.किरणभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सन्मान ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
विद्यमान सरपंच सौ.सुवर्णाताई भाऊसाहेब गायकवाड यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थ यांचे स्वागत केले. विद्यमान सभापती सौ. ज्योतीताई शिंदे, मा. सभापती सौ.निकीताताई घोटकुले, मा.सभापती मा.संतोषभाऊ कुंभार, उपसभापती मा.गणेशभाऊ गायकवाड व मावळ भाजपाचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत ने राबविलेल्या कॅम्प चे कौतुक करून पुढील काळात सर्व ग्रामस्थांना शासकीय योजना मिळण्यासाठी जाॅबकार्ड आवश्यक आहे असे अनेक उपक्रम राबविल्याने कांब्रे ग्रामपंचायत मावळ तालुक्यात आदर्श ग्रामपंचायत ठरू शकते असा विश्वास व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मावळ तालुक्यात कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड यांचा ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या सर्व मान्यवरांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.स्वामी अनंता गायकवाड यांनी केले व कांब्रे व कोंडीवडे गावातील सर्व ग्रामस्थांना शासकीय योजनेंचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील व पुढील काळात सर्व शासकीय योजनेंचा लाभ घेण्यासाठी जाॅबकार्ड आवश्यक असल्याने हा कॅम्प घेण्यात आला असून सर्व ग्रामस्थांनी जाॅबकार्ड काढुन घ्यावे असे अवाहन ग्रामस्थांना केले. तसेच ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामसेवक मा. श्री. तुषार पवार भाऊसाहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कामशेतचे मा. सरपंच विजय शिंदे, विद्यमान सरपंच सौ.सुवर्णाताई भाऊसाहेब गायकवाड, उपसरपंच श्री.किरणभाऊ गायकवाड, विद्यमान सदस्य श्री.स्वामीभाऊ गायकवाड, सौ.कविताताई गायकवाड, सौ.पिंकीताई राऊत, ग्रामसेवक श्री.तुषार पवार भाऊसाहेब, मा. उपसरपंच मा. श्री. गबाजी चिंधु गायकवाड मा.काळुराम गायकवाड, शिक्षण समिती अध्यक्ष मा.लहुभाऊ गायकवाड , मुख्याध्यापक सौ. दिवडकर मॅडम मा. पांडुरंग महाराज गायकवाड मा. संतोष महाराज गायकवाड, मा. तानाजी दाभणे, ज्ञानेश्वर दाभणे, लहु धुमाळ, रोहिदास गायकवाड, सुभाषराव गायकवाड, सर्व जेष्ठ नागरिक व तरुण सहकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी विद्यमान उपसरपंच श्री.किरणभाऊ गायकवाड यांनी आलेल्या मान्यवरांचे, ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी जाॅबकार्ड काढण्यासाठी मोठ्याप्रमाणात उपस्थित दाखविली व ग्रामपंचायत करत असलेल्या कामाबद्दल कौतुक करून ग्रामपंचायतचे आभार मानले.
0 टिप्पण्या