मावळ दि.११ - महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी चालू व्हावी यासाठी वडगाव मावळ येथे पोटोबा मंदिर ते तहसील कार्यालयआंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी, बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील एकेकाळी महत्वाचा खेळ मानला जात होता. या खेळाशी ग्रामीण भागातील लाखो तरुणांचे भावनिक नाते आहे. ग्रामीण भागात यात्रोत्सवात भरविण्यात येणार्या बैलगाडी शर्यतींच्या निमित्ताने होणारी अर्थिक उलाढाल ही मोठी आहे. या बाबींचा विचार करुन बैलगाडी शर्यत सुरु करावी या पुढेबैल गाडा शर्यत चालू होण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करणार ,बैल गाडा मालक आमचा नेता आम्ही तुमचे कार्यकर्ते असे या वेळी बाळा भेगडे यांनी भावनाव्यक्त करताना पोटोबा मंदिरात सांगितले.
बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने व्यापारी वर्ग, वाहतूक व्यावसायिक, छोटे व्यावसायिक, बैलगाडी व्यवसायिक यांची नाळ या व्यावसायाशी जोडली गेली आहे. बैलगाडी शर्यती बंदीचा निर्णय झाल्यापासून या खेळाशी निगडीत सर्व व्यवसायांना मंदीचे दिवस आले आहेत, ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि येथील अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी शर्यती सुरु करणे हाच एकमेव पर्याय आहे.
ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी बैलगाडी शर्यत गरजेची असून राज्यशासनाने अध्यादेश काढून बंदी घातलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात त्यासाठी केंद्रीय सरकारकडे सातत्यातने पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी वडगाव मावळ तालुक्यातील ग्रामस्थ व शर्यतप्रेमी उपस्थित होते.
0 टिप्पण्या