Ticker

6/recent/ticker-posts

मावळात दुर्गा वाहिनी ,बजरंग दलाच सैनिकांसाठी रक्षाबंधन..!*विश्व हिंदु परिषद बजरंग दल व दुर्गा वाहीनी च्या माध्यमातुन घेतला जातोय अनोखा उपक्रम.

    रक्षाबंधन हा सण देश भर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हिंदु संस्कृतित बहिण भावाच प्रेम व्यक्त करणारा हा दिवस, या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधुन सण साजरा करते. बहिण भावाच नात या सणाला अजुन घट्ट होऊन नात्यात आनंदाच वातावरण निर्माण होत. हा सण घरो घरी साजरा केला जातो. 

परंतु देशाच्या सिमांच रक्षण करणार्या सैनिकांना या सणात सहभागी होता येत नाही.आपल्या गावी जाता येत नाही, बहिणींना भेटता येत नाही. परंतु आपल्या सैनिक भावाला राखी तर बांधलीच पाहिजे, जो भाऊ दिवस रात्र सर्वांच्या रक्षणासाठी सिमेवर उभा आहे त्या भावाला राखी बांधन गरजेच आहे. हा भाव लक्षात घेवुन विश्व हिंदु परिषद दुर्गा वाहिनी च्या माध्यमातुन हजारो राख्या तालुक्यातुन गोळा करुन सिमेवरील जवानांना पाठवल्या जाणार आहेत. या साठी चे नियोजन बजरंगदल करणार आहे. 

या उपक्रमाच्या प्रमुख दुर्गा वाहिनी भिमाशंकर जिल्हा संयोजीका अर्पिता फाकटकर यांनी समाजातील माता भगिनींना या संदर्भात अव्हान केल असुन संकलन केंद्रावर राख्या जमा कराव्यात आणि आपल बहिणीच सैनिक भावासाठीच कर्तव्य पार पाडाव.

मावळ तालुका संयोजीका प्रांजल बोडके यांनी संवाद साधत असताना या उपक्रमाला समाज्यातुन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटत आहे असे सांगुन सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान केले. 

संकलन केंद्र टाकवे, वडगाव, देहु, देहुरोङ, तळेगाव, पवनानगर, लोणावळा, कामशेत, सुदुंबरे अश्या विविध ठिकाणी राख्या संकलन करण्यासाठी व्यवस्था केली आहे. 
या उपक्रमाची संकल्पना मा. संतोष भेगडे ( पाटील) यांनी मांडली. यात बजरंगदल विभाग संयोजक संदेश भेगडे, बाळासाहेब खांडभोर, महेंद्र असवले, सुशिल वाडेकर, प्रा गोपिचंद कचरे, मोरेश्वर पोपळे, प्रशांत ठाकर, गोपि शिंदे, तानाजी असवले, विकि शेटे, ओंकार भेगडे, अमोल पगडे, असे अस्यंख्य बजरंगदलाचे कार्यकर्ते सहभागी आहेत.

संपर्का साठी क्रमांक:-
सुशिल वाडेकर :- 8805637575
महेंद्र असवले :- 9975458265

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या