महाराष्ट्रामध्ये लक्ष लागून राहिलेल्या बैलगाडी शर्यत होणार का याबाबत सर्वत्र चर्चा होती . भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार यांना आव्हान देत (दिनांक 20 ऑगस्ट)बैलगाडा स्पर्धा आयोजन केले होते .
राज्य सरकारने प्रत्युतर म्हणून तिथे बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न केले होते परंतु गनिमी कावा करत चार वेगवेगळ्या ठिकाणी शर्यती ची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतली याचा पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणाचा तपास लागला नाही. गाडा मालकांनी एका रात्रीत दुसरीकडे नवीन शर्यतीसाठी जागा केली.
बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता तरीसुद्धा बैलगाडी दुसऱ्या ठिकाणी भरविण्यात आले मात्र असे असतानाही गोपीचंद पडळकर यांनी गनिमीकावा करत बैलगाडा शर्यत संपन्न करून दाखवली.
0 टिप्पण्या