साडेनऊ तास चाललेल्या या उपोषणाकडे पाठ फिरवून तहसीलदार मधुसुदनजी बर्गे यांनी आपली असंवेदनशीलता दाखवून दिली.असे वागण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता?
हा विषय तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्यांनी या विषयात लक्ष घालावे हे सांगून मा.तहसीलदार साहेबांनी आपले अंग का झटकले ?
उपोषण मागे घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे,समन्वयक डॉ.गुणेश बागडे,डॉ.जयेश बिरारी,डॉ.ढवळे यांनी चर्चा केली.पण आम्ही प्रभागशः लसीकरण या विषयावर ठाम असल्याचे सांगितल्यावर आमची मागणी असलेल्या विषयाचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवंत पवार यांना मेल केले.जिल्हाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी फोनवर बोलून या मागणीवर निर्णय घेण्याची मागणी केली.यावर आमच्या कमिटीमध्ये याविषयावर उद्या चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असे सांगितले.व यानंतर गुरुवारी पंचायत समिती येथे बैठक बोलावण्यात आली आहे.व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची बैठक घेऊन पुढील निर्णय होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रभागशः लसीकरण राबविण्याचे आश्वासन दिले असे रविंद्र माने यांनी सांगितले .
यावर माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे यांच्या विनंतीवरुन उपोषण तात्पुरते स्थगित केले व आश्वासनांवर कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे,उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर,उपसभापती शांताराम कदम,समन्वयक डॉ.गुणेश बागडे,डॉ.जयेश बिरारी,श्री.ढवळे,सरचिटणीस प्रदिप गटे,ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे,भाजयुमो उपाध्यक्ष सागर भेगडे,भाजयुमो वडगाव अध्यक्ष रमेश ढोरे,शेखर वहिले,सचिनजी भिडे,भाजयुमो सरचिटणीस पद्मभूषण डंबे,निखिल म्हाळसकर,हे उपस्थित होते.
या उपोषणाला तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे,ज्येष्ठ नेते भास्करआप्पा म्हाळसकर,एकनाथराव टिळे,माजी अध्यक्ष प्रशांत अण्णा ढोरे,जगन्नाथ शेवकर,नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे,सभापती ज्योतीताई शिंदे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,माजी सभापती निकिताताई घोटकुले,माजी उपनगराध्यक्षा अर्चनाताई म्हाळसकर,देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार,प्रदेश महिला उपाध्यक्षा ज्योतीताई जाधव,कार्याध्यक्ष बाळासाहेब झेंडे,कॕन्टोमेंट माजी उपाध्यक्ष राहुल बालघरे,माजी शहराध्यक्ष ॲड.कैलासजी पानसरे,गटनेते अरुणभाऊ भेगडे,नगरसेवक अमोलजी शेटे,तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण,यदुनाथ चोरघे,विठ्ठलदादा घारे,वडगाव गटनेते दिनेशभाऊ ढोरे,किरण म्हाळसकर,युवि नेते नितीनदादा घोटकुले,एकनाथ पोटफोडे,नगरसेविका शोभाताई भेगडे,कल्पनाताई भोपळे,विभावरीताई दाभाडे,संध्याताई भेगडे,सरचिटणीस रजनीताई ठाकूर,शोभाताई परदेशी,देहु शहर अध्यक्ष मच्छींद्र परंडवाल,कार्याध्यक्ष रायबा मोरे,प्रेमकुमार माने,सचिन काळोखे,सागर मुसुडगे,उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित,संजयभाऊ जाधव,गणेशआप्पा भेगडे,आशुतोष हेंद्रे,विनोद भेगडे,रणजित पिंगळे,आनंद दाभाडे,महिला मोर्चा कार्याध्यक्षा अश्विनीताई काकडे,सरचिटणीस तनुजाताई भेगडे,प्रसिद्धीप्रमुख सोनालीताई शेलार,ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव,प्रसिद्धीप्रमुख अनंता कुडे,भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर खेर,अक्षय भेगडे,भाजयुमो संघटनमंत्री केदार भेगडे,नितीन कुडे,प्रकाश क्षीरसागर,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक,क्रिडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे,नामदेव शेडगे,नाथा घुले,सुनील महाराज वरघडे,सागर शिंदे,विकास घारे,राजेंद्र सातकर,धनंजय टिळे,सुशील गाडे,ॲड.सुभाष तुपे,ॲड.स्वामी फुगे,स्वप्निल आंबोले,निखिल वाबळे,उपेंद्र उंडे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,भाजयुमो संघटनमंत्री यादवभाऊ सोरटे,रमण पवार,कालीदास शेलार,अविनाश गराडे यांनी भेट देऊन पाठींबा दिला.
कार्यक्रमाचे नियोजन सरचिटणीस प्रदिप गटे,रविंद्र साबळे,ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीनभाऊ पोटे,व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल,कार्याध्यक्ष सागरशेठ शर्मा,कामगार आघाडी अध्यक्ष अशोकभाऊ दाभाडे यांनी केले.
0 टिप्पण्या