Ticker

6/recent/ticker-posts

तुंग गावात भूस्खलन झालेल्या ठिकाणी नुकसान झालेल्या कुटुंबीयांना रविंद्र भेगडे यांनी दिली भेट...

मावळ - मावळ तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस पडला.त्या पावसात तालुक्यात विविध ठिकाणी घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले.
मावळ तालुक्यातील दुर्गम भागात तुंग किल्याच्या पायथ्याशी असलेल्या तुंग गावात भूस्खलन झाल्यामुळे तेथील रहिवासी सिताराम पाठारे,लक्ष्मण म्हसकर यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या ठिकाणी जाऊन घटनेची पाहणी केली.बाधित ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.
त्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी याकरता पाठपुरावा करणार आहे.
यावेळी तालुका सरचिटणीस सुनीलजी चव्हाण, युवा मोर्चा संघटन मंत्री गणेशभाऊ ठाकर,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, धनगर समाज परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे,किसान मोर्चा सरचिटणीस हरिभाऊ दळवी, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,प्रवीण घरदाळे, नांदुभाऊ कालेकर,गणपत कालेकर,भाऊ कालेकर आणि तुंग गावचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या