Ticker

6/recent/ticker-posts

Pawananagar - तुंग येथे निराधारांचा आधार बनत केली बजरंगदलाने पहाणी..कातकरी बांधवास केला शिधा वाटप


मावळात पावसाने अक्षरशः थैमान घातल मावळ तालुक्यात अनेक वाड्या वस्त्यांवर पुर स्थिति निर्माण झाली अनेकांचे शेती वाहुन गेली, शेताचे बांध फुटुन गेले, अनेकांच्या घरात पाणी शिरल, अनेकांचे संसार डळमळीत झाले. नद्यांना पुर आले. जनजीवन विस्कळीत झाल  त्या मुळे बजरंगदल सारखी संघटना पुढे आली आणि अनेकांना मदतीचा हात पुढे केला. समाज्याच्या विविध स्तरातुन बजरंगदलच्या कार्यकरत्यांना फोन येवु लागले. 

सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले
ध्येय महासागर में सरित रूप हम मिले

अस म्हणत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता या पुर परस्थीतीत पुढे सरसावला. 

तुंग येथे सिताराम पाठारे यांच्या किराणामालाच्या दुकाणावर दरड कोसळल्या मुळे त्यांचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने जिवित हानी झाली नाही. पण वास्तु पुर्णपणे उद्वस्त झाली व दुकानातील मालाची पुर्ण नासधुस झाली या वेळी पाठारे कुटुंबाला भेटुन धिर देवुन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. 
तुंग येथील निराधार महीला कातकरी बांधव यांना शिधा किट देवुन त्यांची आस्थेन चौकशी करत प्रत्येक कुटुंबाच्या घरांची पाहणी केली. तुंग गावातील निराधार आजी सुबद्राबाई दामु पाठारे यांच्या घर या पावसामुळे पडल राहण्या योग्य जागा नाही ,सगळीकडे पाणीच पाणी, पडक घर, मुल बाळ नाही, निट कानाने एैकायला येत नाही कि डोळ्यान दिसत नाही वय वर्षे 75 च्या पुढे अस असताना खुप बिकट परस्थीती या आजी वर ओढावली तरी समाज बांधवांना बजरंगदलाच्या माध्यमातुन अस आव्हान करण्यात येत आहे की या आजीला सर्वोतोपरी मदत करावी. 
*मदतीचे आवाहन google pay*
*बाळासाहेब खांड़भोर 9284353682*    
*सुशील वाडेकर 8805637575*

या वेळी बजरंगदल विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा सह संयोजक बाळासाहेब खांडभोर, राजेंद्र घायाळ, सुभाष भोते, निलेश ठाकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या