तळेगाव दाभाडे दि.२२-तळेगाव दाभाडे शहरामध्ये प्रभागशः लसीकरण अभियान राबवावे या मागणीसाठी मी २३/०७/२०२१ ला तहसीलदार कार्यालय येथे उपोषणाला बसणार!
४-५ दिवस झाले मावळ तालुक्यात लसींचा पत्ता नाही...सरकार एकीकडे तिसऱ्या लाटेची भिती घालत आहेत.आणि दुसरीकडे स्वतःच लसींचा साठा असूनही नियोजनाअभावी नागरिकांची हेळसांड होते आहे.लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन राज्य सरकारला नेमका कुणाचा फायदा करुन द्यायचा आहे.
प्रभागशः लसीकरण नियोजन करुन नागरिकांना दिलासा मिळायला हवा.किंबहुना नागरिकांचा तो हक्कच आहे.
आता जर अचानक तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवला तर लाखो कुटुंबे देशोधडीला लागतील.आर्थिक हानी आणि मनुष्यहानी याबरोबरच प्रचंड अशी बेदिली माजेल राज्य सरकारने आता राजकारण थांबवून मिळत असलेल्या लसींचे योग्य नियोजन करावे असे या बाबत १६ जुलै रोजी यासंदर्भातील मागणी करणारे निवेदन भाजपा तळेगाव शहराच्या वतीने मा.तहसीलदार साहेब यांना देण्यात आले होते.पण यावर काहीही कार्यवाही होत असल्याचे निदर्शनास येत नसल्याने हे उपोषणाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे श्री.रविंद्र माने यांनी सांगितले.
-----------------------------
0 टिप्पण्या