तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मोदी सरकारकडून १ हजार १५ कोटी जाहीर झालेने मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले.तळेगाव - चाकन - शिक्रापुर रस्ता रुंदीकरण होऊन या महामार्गाला जोडणाऱ्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी या पुर्वी मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.या रस्त्याबाबत ते पाठपुरावा करत होते.या साठी अनेकदा ते दिल्लीला ही गेले होते अखेर याला यश येत मोदी सरकारकडून १ हजार १५ कोटी निधी मंजुर झाला आहे आहेत.या मुळे सर्वत्र केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तसेच बाळा भेगडे यांचे अभिनंदन सोशल मिडीया ,फोन द्वारे करत आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याला नेहमीच रहदारी असते. गेल्या काही वर्षांत तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांचा झपाट्याने विकास झाला आहे.
नामांकित कंपन्यांचे अनेक लहान-मोठे प्रकल्प या रस्त्याचा मुख्यतः वापर होतो. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार तळेगावपासून प्रारंभ होणाऱ्या या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, चाकण-शिक्रापूर रस्त्यावर झालेल्या अनेक अपघातांमध्ये गेल्या चार-पाच वर्षात पाचशेंहून अधिक बळी गेले आहेत, तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे. या गंभीर मुद्याकडे हे मा.राज्यमंत्री बाळा भेगडे केंद्रीय रस्ते वाहतूक व माहामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेउन मांडले होते तसेच येथील परिस्थितीची ही जाणीव करून दिली होती. अखेर पाठपुराव्याला यश आले.
0 टिप्पण्या