मावळ दि.२९-समाज कल्याण व महिला बाल कल्याण यांच्या शेष फंडातून मावळ तालुका पंचायत समिती सभापती सौ. ज्योती नितीन शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून महिला करिता शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, झेरॉक्स मशीन तसेच पीठ गिरणी यांचे वाटप भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ मार्गदशक मा. दशरथनाना ढोरे तसेच उपसरपंच योगेश भाऊ शिंदे , आदर्श सरपंच संदीपशेठ काशीद यांच्या हस्ते इंदोरी येथील संघवीहरात वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी इंदोरी भा.ज. पा. अध्यक्ष जगन्नाथभाऊ शेवकर, युवा अध्यक्ष संदीपभाऊ नाटक, ग्रा. सदस्य सौ. कविता चव्हाण, मुकेश शिंदे ,ऋतुराज काशीद, अरविंद शिंदे, अजय शिंदे, विजय शिंदे, नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या