Ticker

6/recent/ticker-posts

Pawananagar - बैलगाडा शर्यत भरविणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या- बजरंग दलाची मागणी



पवनानगर : मावळ तालुक्यात काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतिने बैलगाडा शर्यत भरविणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी बजरंग दलाच्या वतिने नायब तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. त्यावर प्रशासनाकडून कारवाई करत गुन्हे दाखल केले जातात. याउलट आपल्या देशात आणि राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही मोठ्या प्रमाणात गाई-बैल यांसारख्या मुक्या प्रांण्यांची हत्या होत आहे. शेतकरी वर्ग आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे गाई बैलाची सेवा करून पालन पोषण करतो. आणि हौसेपोटी परंपरागत बैलगाडा शर्यत भरवतो. तरी जो गाई-बैल या प्राण्याचा पालनकर्ता आहे, त्या शेतकऱ्यांवरील होणारी कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदु परिषद बजरंग दलाने निवेदनात केली आहे.


यावेळी विभाग मंत्री संदेश भेगडे, जिल्हा संयोजक बाळा खांडभोर, मावळ तालुका अध्यक्ष गोपिचंद कचरे, बजरंग दल तालुका संयोजक महेंद्र असवले, आंदर मावळ संयोजक तानाजी असवले, अमित असवले उपस्थित होते.


संदेश भेगडे (विभाग संयोजक, बजरंग दल) - गोवंश हत्या बंदी कायदा असताना पण सर्रासपणे गाय बैलांची हत्या होत असताना सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे, व इथे शेतकरी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपणाऱ्या बैलांची हौस म्हणून शर्यत भरवतात त्यांच्यावर मात्र गुन्हा दाखल होतो.
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या