मावळ : मावळ तालुक्यात १४०० कोटीच्या वर मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांतुन विकास कामे करण्यात आली आहेत.यावर राजकारणही होत आहे. परंतु खऱ्या अर्थाने मावळ तालुक्यातील जनतेला विकास महत्त्वाचा आहे.उद्या आंदर मावळात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या निधीमधून व विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ११ कोटी १६ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते बुधवारी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
यामध्ये पीएमआरडीए अंतर्गत इंदोरी ते भोयरे रस्ता करणे १० कोटी रुपये, आंबळे निगडे जोडरस्ता पूल बांधणे ६६ लक्ष, कदमवाडी ते गणेश मंदिर रस्ता करणे १७ लक्ष, कल्हाट स्मशानभूमी बांधणे १३ लक्ष, आंबळे येथील पद्मावती मंदिर सभामंडप बांधणे १० लक्ष, कल्हाट स्मशानभूमी सुशोभिकरण करणे १० लक्ष या सर्व विकासकामांचा उद्घाटन समारंभाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.अशी माहीती तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण ,मच्छिद्र केदारी यांनी दिली.
-----------------------------
0 टिप्पण्या