महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष मा श्री रविंद्र अप्पा भेगडे यांच्या वाढदिवसा निमित्त विठु माऊली सोशल फांऊडेशनच्या वतीने उर्से गावातील प्राथमिक शाळेच्या सभागृहात शासकीय योजना आपल्या दारी हा उपक्रम राबवन्यात आला. या उपक्रमात गावातील 145 लाभार्तांना याचा लाभ झाला. या मध्ये जनधन खाते, शासकीय विमा योजना, आरोग्य विमा योजना, बांधकाम कामगार, संजय गांधी पेंशन योजना, नविन मतदार नोंदनी, नवीन राशन कार्ड फॉर्म, शासकीय कर्ज योजना अश्या विविध योजनांची माहीती सांगुन त्या संदर्भातील फॉर्म देखील भरण्यात आले.
भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र अप्पा भेगडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलत असताना बँक अधिकारी केशव डहाळे यांनी बँकेच्या योजनांची माहीती सांगीतली. विठु माऊली सोशल फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण राक्षे यांनी संस्थेच्या माध्यमातुन केल्या जाणार्या कार्याचा वृत्तांत सांगत या उपक्रमाचा लाभ पवन मावळ भागातील प्रत्येक घरा घरा पर्यंत कसा पोहचवता येईल या साठी संस्था प्रयत्नशील आहे हे सांगीतल तर भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या माध्यमातुन सुरु असलेल्या समाज उपयोगी कामच कौतुक केले.या कार्यक्रमात स्वागत ग्राम पंचायत सदस्य सतिश कारके यांनी केले बाळासाहेब धामणकर यांनी आभार मानले तर बाळासाहेब खांडभोर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी केशव डहाळे, भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र अप्पा भेगडे, संघटन मंत्री किरण राक्षे, संचालक शामराव राक्षे, जालिंदर धामणकर, रविंद्र विधाटे, बाबुलाल गराडे, सुभाष धामनकर, बंडोपंत धामनकर, सुधीर बराटे, सरपंच भारती गावडे, उप सरपंच सविता राऊत, प्रदिप बराटे, अश्वीनी बराटे, सोपान वाळुंज, बाळासाहेब धामणकर, संतोष धामणकर, रोहित धामणकर, नागेश बराटे, अभिषेक बराटे, तसेच विठु माऊली सोशल फांऊडेशन चे सदस्य प्रतीभा डहाळे, सिमा भिंगारे, शेफाली कराळे, राधा भिलारे, उमेश घारे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या