मावळ दि.२४ - मावळ तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे यांच्या जन्मदिनाचे( दि.२५)औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे , कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे ओबीसी आघाडी अध्यक्ष रविंद्र विधाटे,धनगर परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे तसेच किसान मोर्चा सरचिटणीस हरीभाऊ दळवी, या सर्व आघाड्यां सरचिटणीस सुनिल चव्हाण ,सरचिटणीस मच्छिद्र केदारी यांच्या मार्गदर्शना खाली आदिवासी, ठाकर -कातकरी वस्तीवर अन्न - धान्य किट वाटप करण्यात येणार आहे.
नुकताच मावळ परिसर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून हातावरती काम असणाऱ्या आदिवासी बांधवास एक मदत व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे असे मच्छिंद्र केदारी यांनी सांगितले.
तसेच काही भागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात येणार आहे .असे सोशल मिडिया अध्यक्ष , वृक्षप्रेमी सागर शिंदे यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या