मावळ दि ११ - मावळ तालुक्यात पठारी भागावर विकास कामे झाले नाहीत अजूनही पठारी भागावर काही गावांमध्ये वीज नाही त्यामुळे पठारी भागावरील विकास खुंटला आहे तेथील मुलांचा शिक्षणाचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उकसान पठार हे आठ ग्रामपंचायत मध्ये विभागले गेले आहे तेथे अजूनही रस्ता,पाणी नाही पाच महिने पठारावरती पायी जाण्याच्या शिवाय दुसरा मार्ग नाही. पाठाचे भागावर काही सर्पदंशाचे प्रकार होत असतात त्यावर प्राथमिक उपचार देखील उपलब्ध होत नाही. काही दिवसापूर्वी आदिवासी मुलांना शिकवण्याचे धडे देणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू झाला होता. अशा घटना घडत आहेत लोकप्रतिनिधींनी यावर लक्ष दिले पाहिजे असे वसुंधरा न्यूजला बोलताना नामदेव शेडगे यांनी सांगितले
जशी शहर भागातील मुलांच्या पालकांना वाटते की आमच्या मुले इंजिनीयर, डॉक्टर ,वकील चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली पाहीजे त्याच प्रमाणे आमच्या धनगर बांधवांच्या पाल्यांनाही वाटते परंतु पूर्व प्राथमिक शिक्षण दर्जा व्यवस्तीत नसल्याने मुलेही शिक्षणापासून वंचित राहतात ही खेद व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या