रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मावळमध्ये...
मावळ दि.११ -मोदी 2.0 सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली अशावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपलं मंत्रिपद तर राखलच वर अधिक चांगल खात देखील मिळवलं.
त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा कायम आहे हे दानवेंनी पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे.
आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे पाटील प्रथमच मावळ तालुक्यात आले होते. यावेळी मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या सह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी
त्यांचे तालुक्यात स्वागत केले.रेल्वे राज्यमंत्री पदी निवड झाल्या नंतर प्रथमच रावसाहेब दानवे यांनी मावळ तालुक्यात भेट दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.
परंतु, नव्या खात्याचा पदभार स्वीकारताच रावसाहेब दानवे मावळ दौऱ्यावर आल्यामुळे मावळ मध्ये राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
याप्रसंगी माजी आमदार दिगंबर भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रशांत ढोरे, रघुवीर शेलार,अरुण भेगडे, संदीप सोमवंशी,जयेश शिंदे,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या