वडगाव मावळ दि.२३ - मावळ तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. बुधवारी (दि.२१) रात्री पासुन मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतीचे तसेच घराचे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .यामुळे मधुसुदन बर्गे तहसीलदार वडगाव मावळ यांनी आज दि.२३ रोजी मावळ भागात झालेल्या घरपड,शेती व इ. नुकसानीचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांच्या पथकामार्फत पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मावळ तालुक्यातील १८६ गावांमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करताना तलाठी यांनी सातबारा संदर्भात पडताळणी करणे व कृषी सहाय्यक यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे व अंदाजित रक्कम निश्चित करणे व घरपट्टीचे नुकसानीचे ग्रामसेवक यांनी तपासणी करावयाची आहे असे आदेशात म्हटले आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करावा पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करावी - रविंद्र भेगडे ,तालुकाध्यक्ष भाजपा
0 टिप्पण्या