Ticker

6/recent/ticker-posts

Maval-सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या सभापतीपदावर दलित समाजातील ज्योतीताई शिंदे यांची निवड ...महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आज ऐतिहासिक दिवस - मा.राज्यमंत्री बाळा भेगडे


मावळ दि.७ - मावळ तालुक्यात आज भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीने सभापतीपदाचा ऐतिहासिक निर्णय घेतं सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर दलित समाजातील ज्योतीताई शिंदे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.निवडणूक प्रक्रिया पंचायत समिती येथे पार पडली.सभापती पदासाठी त्याचा एकमेव अर्ज आलेने निवडणूक बिनविरोध झाली.त्यांच्या निवडीची घोषणा मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी केली.
                भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.सभापतीची निवड ही महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आज ऐतिहासिक दिवस ठरणार आहे तसेच भारतीय जनता पार्टी ही फक्त एक विशिष्ट जातीची पार्टी म्हणून तिला वारंवार हिनवल जातं आशा हिणावणार्या लोकांना हि मोठी चपराक असणार आहे असे मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 
        
        आज मावळ तालुक्यात पहिल्यांदा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर दलित समाजाच्या विध्यमान पंचायत समिती सदस्य ज्योतीताई शिंदे यांस सभापती पदी निवड करण्यात आली हे फक्त भारतीय जनता पार्टीमधेच होऊ शकतं असे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी या वेळी सांगीतले.

           काही पक्ष स्वतःला पुरोगामी म्हणवतात आणि जाती जाती भांडण लाऊन स्वतःच्या पक्षांची पोळी भाजतात अशांना सोडोत्तर उत्तर भाजपा ने या निवडीने दिले आहे.

       या वेळी पु.जि.RPI अध्यक्ष सुर्यकांत वाघामारे, प्रभारी भास्करआप्पा म्हळस्कर, युवा मोर्चा  तालुकाध्यक्ष संदिप काकडे,महीला तालुकाध्यक्ष सायलीताई बोत्रे,सरचिटणीस सुनिल चव्हाण ,मच्छिद्र केदारी,जेष्ठ नेते माऊली शिंदे,एकनाथ टिळे,राजाराम शिंदे,शंकरनाना शिंदे,बाबुलाल गराडे,जि.प.सदस्य अलकाताई धानिवले,नितिन मराठे,मा.सभापती निकिताताई घोटकुले,उपसभापती दत्ता शेवाळे,शांताराम कदम ,गुलाबकाका म्हाळस्कर ,सुवर्णा कुंभार ,जिजाबाई पोटफोडे,कार्यध्यक्ष अर्जुन पाठारे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष  विकास लिंभोरे,नामदेव वारिंगे,नामदेव शेडगे,रविंद्र विधाटे, सचिन भांडे,सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे,कि. मो.सरचिटणीस हरिभाऊ दळवी,वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे ,विकी म्हाळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या