लायन्स क्लब कामशेत लायन्स क्लब कामशेट च्या रौप्य महोत्सवी वर्षात लायन अंजली सहस्रबुद्धे यांची अध्यक्षपदी निवड झाली यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व संचालक मंडळावर महिला लायन सदस्यांची निवड करण्यात आली आहे सचिव पदी लायन नंदा शेट्टी आणि खजिनदारपदी लायन आशा अग्रवाल असून प्रथम उपाध्यक्ष लायन सायली बोत्रे ह्या आहे तसेच लायन सीमा गुंजाळ लायन सुवर्णा चोपडे लायन दीक्षा गायकवाड लायन दिपाली ठोंबरे लायन रत्नम नायर या कार्यकारणी सदस्य आहे
गेली पंचवीस वर्षे मावळ तालुक्यात ग्रामीण भागात अनेक समाजोपयोगी उपक्रम लायन्स क्लब कामशेत तर्फे यशस्वीपणे घेण्यात आले तसेच समाजातील अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक वैद्यकीय उपक्रमांमधून त्या त्या क्षेत्रातील तज्ञ नामवंत मान्यवरांचा सत्कार करून त्यांची दखल घेण्यात आली
नवीन वर्षात महिला आणि बालकांसाठी जास्तीत जास्त उपक्रम राबविण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष लायन अंजली सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला
लायन्स क्लब कामशेत ला सर्व स्तरातून रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहे
0 टिप्पण्या