Ticker

6/recent/ticker-posts

कार्ला:-आई एकविरा युवा विकास प्रतिष्ठान,दहिवली यांच्या वतीने वृक्ष लागवड आणि संवर्धन उपक्रम...



कार्ला:-आई एकविरा युवा विकास प्रतिष्ठान,दहिवली यांच्या वतीने मागील वर्षांपासून मोठया प्रमाणात वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे.
              वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्जन्यमानावरही परिणाम झाला आहे.पाऊस वेळेवर येतं नाही.याचा विपरीत परिणाम पर्यावरण आणि शेतीवर होत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून वृक्षारोपण व त्याचे पोटच्या मुलाप्रमाणे संवर्धन करावे; असे आवाहन "आई एकविरा युवा विकास प्रतिष्ठान,दहिवली'' यांच्या सदस्यांनी केले.
    प्रतिष्ठानच्या वतीने मागील वर्षी दहिवली गावामध्ये १००० वृक्ष जगवण्याचा संकल्प करण्यात आला होता.त्या उपक्रमार्गत मागील वर्षी ४०वृक्षाची लागवड करण्यात आली होती.वृक्षासाठी कठीण काळ हा उन्हाळा असतो त्या उन्हाळामध्ये वेळेवर झाडांना पाणी घालण्याचे काम करून संवर्धन करण्यात आले.ह्यावर्षी देखील प्रतिष्ठानच्या वतीने ३४ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
       याप्रसंगी वेहेरगाव-दहिवलीचे मा.सरपंच सचिन येवले,भाजप प्रसिध्दी प्रमुख मावळ सागर शिंदे,संजय येवले,सोमनाथ येवले,नितीन येवले,प्रदीप येवले,मुकुंद येवले,सर्वेश येवले,भूषण पडवळ,यश पडवळ,योगेश पडवळ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या