मावळ तालुक्यात वडगाव , देहुरोड , तळेगाव, कामशेत, लोणावळा, पवनानगर, परंदवडी, नवलाख ऊंब्रे येथे निदर्शने करुन निवेदन देण्यात आले.
देशात सर्वत्र गोरक्षा बंदी कायदा असताना, महाराष्टातही हा कायदा लागु असताना गोरक्षा कायदा पायदळी तुडवला जात आहे . गोवंशाच्या चोरीचे प्रमाण वाढल आहे. गो तस्करी करणारी टोळी पुणे जिल्हात सक्रीय झाली असुन काही दिवसांपुर्वी भोसरी येथील घटना ही अत्यंत लाजीरवाणी आहे. त्याच प्रमाणे सर्वत्र दलालांचा सुळसुळाट झाला असुन कसायांच्या घटणांमध्ये वाढ झाली आहे. मावळात स्थानीक मंडळी कसायांच्या भुल थापांना बळी पडुन पैशासाठी लाचारी पत्करुन कसायांना पाठीशी घालण्याच जे काम सुरु आहे अश्या कायद्याची अमल बचावणी पायदळी तुडवणार्या कसाई, दलाल व स्थानीक दलाल यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी व गोरक्षा कायद्याजी काटेकोर पणे अमल बजावणी करण्यात यावी या साठी ठिक ठिकाणी निदर्षणे करुन आंदोलण करण्यात आले व त्याच बरोबर पोलिस प्रशासन व तहसील दार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी जिल्हा धर्मप्रचार प्रमुख प्रा. गोपिचंद कचरे यांनी गोरक्षणाचे महत्व विषेद केले तर बजरंगदल जिल्हा सह संयोजक व्याख्याते बाळासाहेब खांडभोर यांनी होणार्या घटनांचा तिव्र निषेद करुन अश्यी कृत्य करणार्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी व गोरक्षा कायद्याची अमल बजावणी करुन अश्या घटणांना पायमल्ली घालण्या साठी प्रयत्न करावेत नाहीतर पुढिल काळात विश्व हिंदु परिषद बजरंग दल मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल असे म्हणाले.
या ठिकाणी अमोल पगडे, मोरेश्वर पोपळे, अभिमन्यु शिंदे,अर्जुन शिंदे,शंकर पिंगळे ,सितेज जैन, गोपी शिंदे, मोहन वाघमारे, नवनाथ मोढवे, महेंद्र असवले, निखिल भांग्रे, गणेश वैद्य , आकाश वारुळे, दत्तात्रय गरुड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------
वसुंधरा LIVE
https://youtube.com/channel/UCRFp1PQfIJR4wTVAHvqNEGA
0 टिप्पण्या