वडगाव मावळ दि.१७ - कामशेट शहरामध्ये कापड व्यापारी , ज्वेलरी, इलेक्ट्रिक, फोटोग्राफर, केशकर्तनालय व इतर व्यावसायिक अत्यावश्यक सेवा वगळता गेली 70 ते 75 दिवस सरकारी नियमाप्रमाणे संपूर्ण कामशेत बाजारपेठ बंद आहे परंतु सरकारी आदेशानुसार सर्व विभागाने आपले निर्णय स्वतः घ्यायचे आहेत त्यानुसार लोणावळा ,तळेगाव दाभाडे, वडगाव व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी आपल्या खात्यामध्ये सर्व दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.
तरी कामशेत शहरातील आस्थापना यांना उघडण्यास परवानगी मिळणे बाबत माननीय तहसीलदार वडगाव मावळ तसेच गट विकास अधिकारी वडगाव श्री वाजे यांना याबाबत निवेदन दिले आहेत .त्यांनी त्वरित अहवाल पाठवून वरिष्ठांना कळवू असे सांगितले.यावेळी मा.उपसभापती शांताराम कदम, श्रीपाल तिलोकचंद जैन, अभिमन्यु प्रकाश शिंदे, रुपेश शंकर गायकवाड, सुरेश व.ओसवाल उपस्थित होते.
0 टिप्पण्या