Ticker

6/recent/ticker-posts

Kamshet -कामशेत येथील उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची सह्याद्री प्रतिष्ठाणची मागणी ...

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर याच मावळ भूमीतील मावळ्यांच्या बळावर अतुलनीय पराक्रम करत हे हिंदवी स्वराज्य वाढीस लावले. याच मावळ परिसरात अनेक ऐतिहासिक स्थळे असून या उड्डाणपूलापासून किल्ले तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर या ऐतिहासिक किल्ल्याना जाता येते. या मावळ भूमीत अनेक ऐतिहासिक लढाया झालेल्या आहेत त्याची साक्ष हे गडकिल्ले आणि ऐतिहासिक वारसा स्थळे देत आहेत. हा वैभवशाली अध्याय जनमानसात पोहचणे गरजेचे आहे. मावळ तालुक्यात संभाजी महाराजांचे एकही स्मारक अथवा एकही वास्तू त्यांच्या नावाने नाही यासाठी या पुलाला जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले तर हा इतिहास लोकांपर्यंत जाण्यास वाव मिळेल. तसेच इतिहासातील या त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन केल्यासारखे होईल.असे सह्याद्री प्रतिष्ठानने निवेदनात म्हटले आहे.

या पुलामधे भ्रष्टाचार झाला असा आरोप करत या पुलाचे उद्घाटन करणार नाही असे सांगण्यात येते .असे असेल तर एक कामशेतचा नागरीक म्हाणुन आम्ही सर्व कामशेतकर या पुलाचे उध्दाटन करु - अभिमन्यु शिंदे, एक कामशेतकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या