कामशेत दि.१४ - कामशेत करोणा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील ३५१ भाजी विक्रेते तसेच किराणा दुकानदार, दूध व्यवसायिक,फळ विक्रेता यांची आर्टिफिशियल तपासणी करावी जेणेकरून कामशेट मधील करोणा संसर्ग टाळता येईल असे आवाहन भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे तसेच कामशेत आरपीआय (A) उपाध्यक्ष रुपेश गायकवाड यांनी मागणी केली आहे.असे निवेदन मावळ पंचायत समिती सभापती निकिताताई घोटकुले यांना दिले
काही दिवसांपूर्वी कामशेट शहरामध्ये करोणा चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. दररोज दहा ते पंधरा पॉझिटिव्ह पेशंट हे कामशेत शहरांमध्ये सापडत होते. सद्यस्थितीमध्ये पेशंटची संख्याही कमी प्रमाणामध्ये दिसून येते हे प्रमाण कमी होण्यासाठी कामशेत शहरांमध्ये भाजीविक्रेते किराणा विक्रेते दूध व्यवसायिक यांची आर्टिफिशिअल तपासणी झाली तर करोणा संसर्ग आटोक्यात आणू शकतो.
0 टिप्पण्या