पवन मावळ मधिल तिकोणा पेठ येथे जिल्हा परिषद पुणे , पंचायत समीती मावळ आरोग्य विभाग व विठुमाऊली सोशल फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ राक्षे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोणा चाचणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 34 ग्रामस्तांच्या तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित ग्रामस्तांची काळजी घेवुन तपासणी केली गेली.
या वेळी उपस्थित असणारे आरोग्य अधिकारी राजेंद्र मोहिते व विजय वाल्हेकर सर यांनी कोरोणा काळात घ्यावयाच्या काळजीची सविस्तर माहिती दिली. विठुमाऊली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ राक्षे यांनी ग्रामस्तांना या कोरोणाच्या काळात मी व माझी संस्था पवनमावळ मधील प्रत्येक नागरीकाच्या पाठिशी खंबिर पणे उभी आहेे असा विश्वास व्यक्त केला.
विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या वतिने कोरोणा योद्दा म्हणुन डॉ राजेंद्र मोहिते, डॉ विजय वाल्हेकर, लॅब टेक्निशियन वासीम तांबोळी सर, आशासेवीका साधना खैरे व निर्मला शिंदे यांचा कोरोणा योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला.
या ठिकाणी किरणजी राक्षे, किरण बोडके, तिकोणा पेठच्या सरपंच ताई बोडके, सदस्य स्वप्नील तुपे, पोलिस पाटिल अनंता खैरे, उप सरपंच ज्ञानेश्वर मोहळ ,अनंता वरवे, गणपत बोडके आदी मान्यवर उपस्थित होेते.
0 टिप्पण्या