कामशेत - कांब्रे ना.मा. येथील जिल्हा परिषद शाळेला जनसेवक देवा गायकवाड (Deva Gayakwad )यांच्या सहकार्यातून व ग्रामपंचायतच्या मागणीनुसार दोन संगणक देण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेने ग्रामपंचायतकडे दोन संगणकाची मागणी केली..ही बाब जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड यांना सांगीतल्यावर लगेच हिंजवडी येथील FULCRUM WORLD WIDE कंपनीचे प्रमुख..श्री. भिलारे साहेब यांना संपर्क करून त्वरीत दोन नवीन संगणक कंपनीच्या C.S.R फंडातून मंजूर केले.
आज स्वतः श्री. भिलारे साहेब यांनी ग्रामपंचायत व शाळेला भेट देऊन संगणक दिले..यावेळी मा.उपसभापती मा.गणेशभाऊ गायकवाड,जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड, सरपंच सौ.सुवर्णाताई गायकवाड, उपसरपंच श्री. किरण गायकवाड, सदस्य श्री.स्वामीभाऊ गायकवाड, ग्रामसेवक पवार भाऊसाहेब मा. उपसरपंच काळुराम गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, मुख्याध्यापक सौ. दिवडकर मॅडम, शिक्षक श्री. गुरव सर उपस्थित होते.
*FULCRUM WORLD WIDE* या कंपनीचे प्रमुख श्री. भिलारे साहेब यांचा सत्कार मा उपसभापती श्री.गणेशभाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. व जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड यांचा ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुढील काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणसाठी जी काही मागणी असेल ती आम्ही पुर्ण करु असे आश्वासन जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड व श्री. भिलारे साहेब यांनी दीले. शाळेच्या वतीने श्री. भिलारे साहेब, पै.देवाभाऊ गायकवाड व ग्रामपंचायत चे आभार मानण्यात आले.
0 टिप्पण्या