कामशेत दि.१४ - कुसगाव खुर्द येथील ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षांपासून अंतर्गत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत हद्दमधील प्रत्तेक नागरीकांना त्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी कुसगाव खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच यांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाण्याबाबत होत असलेली अडचण बोलून दाखवली.यावेळी
नितीन मराठे (Nitin Marate)यांनी पाईप लाईनचे काम लवकरात लवकर होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करून असे आश्वासन दिले .
यावेळी कुसगाव खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच सुधीर लालगुडे,मा.उपसरपंच बंटीशेठ लालगुडे,भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामशेत ग्रामपंचायत सदस्य रुपेश गायकवाड उपस्थित होते.
-----------------------------
0 टिप्पण्या