पंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा येथील आमदार स्व.भारत भालके यांचे निधन झालेने लागलेल्या पोट निवडणूकीचा निकाल आज रोजी जाहीर झाला यामध्ये समाधान आवताडे यांनी भागीरथ भालके यांचा ३७१६ इतक्या मताने पराभव केला.
समाधान अवताडे(BJP)-
भागीरथ भालके(NCP)-
पंढरपूर-मंगळवेढा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.भाजपच्या या विजयाचे श्रेय सोलापूर प्रभारी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांना जाते.बाळा भेगडे हे निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान होईपर्यत आपल्या मावळच्या कार्यकर्त्यांसह तळ ठोकून होते.
निवडणूक भाजपला म्हणावी तेवढी सोपी नव्हती राज्यात असलेला सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना- काँग्रेस इतर पक्ष यांच्याविरुद्ध भाजपा अशी थेट लढत होती.त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील भगीरथ भालके यांच्यासाठी पंढरपूरला ठाण मांडून बसले होते.पण अखेर विजयाची माळ समाधान आवताडे यांच्या गळ्यात पडली आहे.
पंढरपूरमध्ये प्रशांत मालक परिचारक -समाधान अवताडे गट यांना एकत्र आणत निवडणूक भाजपने चुरशीची केली होती. निवडणुकीची जबाबदारी मा. राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्याकडे सोपवली असल्याने त्यानी दोन्ही गटात समनव्य साधून,प्रचार दौरे आणि कार्यकर्त्याचे संघटनात्मक नियोजन करून ह्या विजयात मोठा वाटा उचला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक ही सुरुवाती पासूनच अतिशय अतितटीची झालेली आपल्याला पाहायला मिळाली.त्यामध्ये मावळ तालुक्यातून आमदार सुनील शेळके यांनीही पंढरपूर, मंगळवेढा येथे येऊन राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार केला.आ.सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांच्या विषयी टीका टिप्पणीही केली होती.परंतु याकडे लक्ष न देता बाळा भेगडे यांनी संयमाची भूमिका घेत आपल्या कामाकडे लक्ष ठेवले. आज निकालातून त्यांचा संयम आणि झालेला विजय यातून स्पष्ट दिसून येतो.त्यांनी मावळ तालुक्यातील कार्यकर्त्याना निवडणूकमध्ये सक्रिय केले होते.
बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळचे कार्यकर्ते पंढरपूर-मंगळवेढा येथे बुथ रचना,योग्य नियोजन, संघटनात्मक बैठका घेऊन कार्य करत होते.निश्चितच या विजयामध्ये बाळा भेगडे यांच्या प्रभावी नियोजनाचा हात आहे.
-----------------------------