तळेगाव दाभाडे:-मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ झाल्याने सर्व हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन,रेमडीसेवरचा मोठा तुटवडा जाणवत आहे.अशातच एक सामाजिक बांधिलकी जपून आपण समाजाला काहीतरी देणे लागतो,या भावनेने मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे विश्वासू सहकारी केदार भेगडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या माध्यमातून 100 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर पायोनिअर हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येते मदत म्हणून दिले.
याप्रसंगी मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, नगराध्यक्ष चित्राताई जगनाडे,उपनगराध्यक्ष सुशीलभाऊ सैंदाणे,मा.चंद्रकांत शेटे,नगरसेवक संतोष दाभाडे,नगरसेविका शोभाताई भेगडे,सुनिलभाऊ भेगडे,विनोद भेगडे,युवा अध्यक्ष अक्षय भेगडे, सरचिटणीस रवी साबळे विनायक गंगाराम भेगडे,प्रदीप भाऊ गटे,आशुतोष हेंद्रे आदी प्रमुख मान्यवर,कार्यकर्ते उपस्थित होते...