Ticker

6/recent/ticker-posts

Maval- सुतार समाज व पोलिसांबांधवांच्या मदतीने सहा वर्षाच्या दिव्यांग बांधवाच्या पायावर केली शस्त्रक्रिया....

सुतार समाज व पोलिसांबांधवांच्या मदतीने दिव्यांग बांधवाच्या पायावर केली शस्त्रक्रिया....
मावळ- मावळतालुक्यातील, एक दिव्यांग बालक गौरव किशोर सुर्यवंशी (वय वर्षे ६), रा.दारुंब्रे, ता.मावळ, जिल्हा पुणे-- याचा एक पाय हा निकामी असल्याने त्याला स्वतःच्या पायाने चालणे तर दूरच, पण साधे उभे सुद्धा राहता येत नाही
किंबहुना त्याने उभे राहण्याचा जर चुकून प्रयत्न जरी केला तरी तो कोलमडून पडायचा आणि ....
"मला इतरांसारखं उभं राहता येत नाही, चालता येत नाही".... हे त्याच्या मनावर बिंबवले जात आहे आणि तो नकारार्थी जीवनाकडे वाटचाल करीत आहे.
त्याच्या आई-वडिलांची अवस्था तर यापेक्षा वाईट झालेली आहे की आमचा मुलगा हा सरपटत का चालतो ? तो केव्हा चालायला लागेल ? 
वास्तविक पाहता, या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहीत होते परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, ऑपरेशनचा खर्च पेलणे शक्य नाहीम्हणून शांत बसण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांना सलत होते.

                अशा वेळी त्यांना गौरवची माहिती कळताच, त्याच्या आई-वडिलांच्या मनाची अवस्था कळताच, वाऱ्यासारखी महासंघाचे हे मावळे आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावले आणि विशेष म्हणजे मावळणी भगिनी सुद्धा पुढे सरसावल्या आणि बघता बघता....
केवळ ४-५ दिवसांत रुपये ३२,२५१/- जमा करून दाखवले आणि गौरवच्या आई-वडिलांना मोठा मानसिक आधार दिला.
सदर निस्वार्थी वृत्तीचे सेवाभावी कार्य ऐकून महाराष्ट्र राज्यातील काही सुतार समाज बांधवांनी अगदी स्वेच्छेने व मोठ्या मनाने मदत केली.
               याशिवाय हे उत्कृष्ट कार्य ऐकल्यावर येथील परिसरातील परंदवाडी पोलिस चौकीत कार्यरत पोलिस बांधवांनी सुद्धा तब्बल रु.१०,०००/- स्वेच्छेने मदत करत समाजापुढे एक मोठा आदर्श ठेवला
चि. गौरवचे ऑपरेशन हे थेरगाव येथील ऑरेंज हॉस्पिटल येथे दि.१४ मे रोजी होणार होते, परंतु वरील मदत हि वेळेच्या आत त्वरित झाल्यामुळे, येथील ऑपरेशन करणारे तज्ञ डॉ.राजीवजी निरावणे यांनी आज शुक्रवार,  दि.७ मे २०२१ रोजी ऑपरेशन करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आणि सदर ऑपरेशन हे यशस्वीपणे पार पाडण्यात ते सफल झालेसर्वांची साथ, मदतीचा हात, वृत्ती निःस्वार्थ‌ ... यामुळेच गौरवच्या जीवनाला मिळाला एक प्रकाशमय मार्ग मिळाला.