Ticker

6/recent/ticker-posts

Mumbai-पंढरपूर - मंगळवेढा पोट निवडणूक मधे विजयी उमेदवार समाधान अवताडे यांच्या विजया बद्दल बाळाभाऊ भेगडे यांचा मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला विशेष सत्कार .


मुंबई  दि.८ - संपुर्ण महाराष्ट्रचे लक्ष लागलेल्या पंढरपूर - मंगळवेढा पोट निवडणूक मधे समाधान अवताडे यांच्या विजया बद्दल या विजयाचे शिल्पकार मा.राज्यमंत्री  बाळा भेगडे यांचा सत्कार मा.मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.सर्वानी या विजया बद्दल बाळा भेगडे यांचे संघटनात्मक कामाचे कौतुक करण्यात आले. 
या वेळी आमदार समाधान आवताडे यांनी सर्वाचे आभार मानले या निवडणूक मधे विजया मधे योगदान असलेले
खासदार रनजीत निंबाळकर,मा.मंत्री गिरीष महाजन ,मा.मंत्री सदाभाऊ खोत,संघटणमंत्री श्रीकांत भारतीय,आमदार प्रशांत परिचारक,आमदार रनजीतसिंह मोहीतेपाटील,आमदार सचिन कल्यानशेट्टी,आमदार जयकुमार गोरे,आमदार राम सातपुते,जिल्हाअध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी मान्यवर तसेच पदाधीकारी उपस्थित होते.