कामशेत दि.१५- कामशेट ही मावळ तालुक्यातील मोठी बाजारपेठ या मुळे रोज असनारी गर्दी प्रशासनाला कळीचा मुद्दा ठरला होता परंतु या लॉकडाऊन मधे योग्य नियोजना मुळे गर्दी होण्यावर नियंत्रण आणले.
मागील काही दिवसांमध्ये कामशेट शहरामध्ये कोरोना पेशंटची संख्या मध्ये वाढ झालेली होती परंतु शासनाच्या पाच दिवसाच्या या लॉकडाऊन चा फायदा नक्कीच झालेला दिसून येतो.
शासकीय प्रशासन वरती असलेला ताण कमी झालेला दिसून येतो रोजची पंधरा ते वीस पेशंटची असणारी संख्या आता ४,५ वर आलेली आहे.यामध्ये कामशेट शहरांमध्ये पोलीस प्रशासनाची योग्य नियोजन तसेच ग्राम सुरक्षा दल ग्रामपंचायत खडकाळे यांनी केलेले सहकार्या हे ही जमेची बाजू आहे.असेच सहकार्य यापुढेही सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी केल्यास नक्कीच आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो असे युवा कार्यकर्ते रुपेश गायकवाड यांनी बोलून दाखवले....
0 टिप्पण्या