पवनानागर:-केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल,मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने ''सेवा सप्ताह" साजरा करण्यात आला.
कोरोना सारख्या महामारीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची पूर्णवेळ सेवा करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे, आढले तसेच इतर उपकेंद्र येथील डॉक्टर्स,नर्स,आशासेविका आणि इतर कर्मचारी यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी, जगात सुप्रसिद्ध असणारी लोणावळा चिक्की भेट म्हणून देण्यात आली.
. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अलकाताई धानिवले,सभापती निकिताताई घोटकुले,मा. उपसभापती जिजाबाई पोटफोडे,महिला आघाडी अध्यक्षा अश्विनीताई साठे,भायुमो कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,डॉ.मोहिते,डॉ.क्षीरसागर,चेअरमन गणेश धनिवले,संघटनमंत्री गणेश ठाकर, सरचिटणीस बाळासाहेब जाधव,गणाचे अध्यक्ष नारायण बोडके,शंकरराव लोखंडे,संदीप भूतडा, बबनराव कालेकर,अंनता वर्वे,ज्ञानेश्वर ठाकर,काले सरपंच खंडू कालेकर,संतोष दळवी, अमित कालेकर,येळसे उपसरपंच अक्षय कालेकर,काले उपसरपंच प्रवीण घरदाळे,निलेश ठाकर, नवनाथ(पप्पू ) ठाकर,सचिन भोरडे,विक्रम वाजे,दत्तात्रय केदारी,विकास ठाकर,अमर ठाकर,विशाल काळे,भाऊ ठाकर,मंगेश सुतार,आकाश घारे,निखिल ठाकर,चैतन ठाकर आदी मान्यवर व रुग्णालयातील कर्मचारी वर्ग व आशासेविका उपस्थित होते.
0 टिप्पण्या