Ticker

6/recent/ticker-posts

मावळ:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या सात वर्षाच्या कार्यपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने "सेवा सप्ताह' चे आयोजन...* *ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राना मदत...*

मावळ:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या सात वर्षाच्या यशस्वी कार्यपूर्ती निमित्त मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने "सेवा सप्ताह" चे आयोजन करण्यात आले.
                 सेवा सप्ताह अंतर्गत कान्हे, तळेगाव दाभाडे,टाकवे बुद्रुक, येथील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राना पीपीई किट,सॅनिटायझर, मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना काळात जनतेची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस,कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. 
                    यावेळी मा.राज्यमंत्री श्री बाळाभाऊ भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे,मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,मा. उपसभापती शांताराम कदम, गणेशभाऊ गायकवाड,युवा नेते देवभाऊ गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष संदीपभाऊ काकडे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, गणेशभाऊ कल्हाटकर,नगरसेवक अरुण भेगडे, सरचिटणीस सुनिलभाऊ चव्हाण,भाजपा मावळ प्रसिद्धीप्रमुख संदीप सातकर,रोहिदास असवले, उपसरपंच महेश सातकर,केदार भेगडे,नवनाथ सातकर, शशिकांत कुटे,केतन सातकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या